Monday, December 3, 2012

सोमय्या महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन

सोमय्या महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन

२६ नोव्हेंबर १९४९ हा भारतात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगातील सर्वात श्रेष्ठ समजले जाणारे 'भारतीय संविधान' याच दिवशी राज्यघटना समितीने स्वीकारले होते. यानिमित्ताने सोमय्या महाविद्यालयातील पुस्तक प्रदर्शनात भारतीय संविधानाशी निगडीत साहित्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित ग्रंथसंपदा प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
के. जे. सोमय्या महाविद्यालय आणि इंटर्नल क्वालिटी अशुरन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते. या पुस्तक प्रदर्शनात गुजराती, हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील साहित्यसंपदेचा वाचकांनी आनंद लुटला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुधा व्यास यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद््घाटन करण्यात आले.
प्रदर्शनाला भेट देणार्‍या विद्यार्थ्यांनी आवडलेल्या पाच पुस्तकांची नोंद करायची, ही अभिनव कल्पनाही राबविण्यात आली. त्यामुळे 'सचित्र विश्‍वकोश' हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक पसंतीस उतरले.

No comments:

Post a Comment

Blog Archive